STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Others

3  

Deepali Thete-Rao

Others

मज घेऊनी चल ना सखे सवे...

मज घेऊनी चल ना सखे सवे...

1 min
39

मज घेऊनी चल ना सखे सवे 

हा वारा तुझा गंध वहात नाही

त्या गंधाची सवय मला

अडके श्वास .. उगा मग गहिवरत राही


मज घेऊनी चल ना सखे सवे

 किती शोधू परी तू दिसत नाही

तुझ्या सोबतीची सवय मला

उगा नजर मग धूसर होई


मज घेऊनी चल ना सखे सवे

स्पर्श तुझा इथल्या कणाकणा

 पुन्हा अनुभवू पाहता तुला 

उगा मी असा अनोळखी होई


मज घेऊनी चल ना सखे सवे

पाऊस ओला शाम ए गझल गाई

हातातील हाताची सवय मला

 धुंद या हवेतही रोमांचित तनु होत नाही


मज घेऊनी चल ना सखे सवे

 परतुनी ये थांबलो इथेच कधीचा

तुझ्या साथीची सवय मला

तसा मी कुठे..कधी गेलोच नाही


मज घेऊनी चल ना सखे सवे

तुजविण जगल्या क्षणांचा खच इथे पडला पाही

या पळांनी काळ व्यापला

वेळ आहे अजूनही म्हणता अंतर हे वाढत जाई


मज घेऊनी चल ना सखे सवे

पोरका इथे मी..तुला आठवून पाही

जीव प्रिये कातर कातर माझा

आठव कशाचा..मी तुला विसरलोच नाही


Rate this content
Log in