STORYMIRROR

Ketaki Vaidya - Music

Abstract Others

3  

Ketaki Vaidya - Music

Abstract Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
200

दृश्य-अदृश्याचा सांधते ही मेळ

निळाईत चाले हिचा रोज खेळ

गुंततो जीव पाहता रंगमेळ

अशी मोहविते ही सांजवेळ...


कुठे भासवी "ती" अधीर अधीर

कुठे नादवी "तो" गुंतवी समीर

कुठे साधते "ती" आपुलाच डाव

कधी होय "हीच" बेईमान वेळ ...


तिथे सागरी होय सूर्यास्त दूर

इथे चंद्र सज्ज पाहता समोर

पुसण्या तमाची पुसटशी ओळ

रंगवी श्रीहरी नभी सांजवेळ... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract