फूल
फूल
दुरूनच ह्या जगाला
कितीदा न्याहाळले
स्वतःनेच स्वतःला
आज थोडे जाणले...
संमिश्र भावनांना
जरा भान आले
भिजले सुरात शब्द
गीतास प्राण आले...
कळले न जे मजला
ते अर्थवाही झाले
सांगून सुरच गेले
शब्दांच्याही पलीकडले...
जाणून मर्म सारे
हलके हसू उमलले
क्षणात एका कळीचे
आज फुल झाले...

