एक तरी कविता आज स्फुरावी
एक तरी कविता आज स्फुरावी
एक तरी कविता आज स्फुरावी
खोल खोल गाभाऱ्यातून
हलके हलके पाझरावी
एकतारी कविता आज स्फुरावी
आत आत दडलेली
कधी काळी तुटलेली
किंवा काही सुटलेली
भावनांची विविधरंगी
नक्षी पानी उमटावी
एकतरी कविता आज स्फुरावी
कोण जाणे केव्हा कसे
होईल मन तुझे रिते?
आठवणींच्या बटव्यातून
डोकावतील सारी गुपिते
अक्षरांच्या धिंगाण्याने
कोरी पाने फुलून यावी
एकतरी कविता आज स्फुरावी
