आशावाद ...
आशावाद ...
कळू दे आता मौनांचे इशारे
लागू दे अर्थ शब्दातील सारे
शोधू दे नव्या सागरांचे किनारे
लाभु दे बळ "तुझे" पंखास या रे
घेऊ दे कवेत आकाश तारे
गाठू दे कधी क्षितिजासही रे
जाणू दे गूढ पृथ्वी गाभ्यातले रे
लागू दे तर्कही अतर्क्यातले रे ।।
