STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Tragedy Others

4  

सचिन विश्राम कांबळे

Tragedy Others

आशेत जगतो...

आशेत जगतो...

1 min
393

ये माऊली, धरणी माता

चरणी ठेवितो माथा..

कष्ट करतो अमाप,

तरी मनी भय अपयशाचे

गाळला घाम येथे

फळ मिळेल का कष्टाचे...

मेघ राजा बरसला

आनंद जीवनी आला...

केली ती नांगरणी पेरणी,

तरी मनी भय अपयशाचे

पिकेल का रे धान्य

यश मिळेल का प्रयत्नाचे...

मोठे ते शेत झाले

पिक पिकाया लागले...

झाली वेळ कापणीची,

तरी मनी भय अपयशाचे

थैमान अवकाळी पाऊस घालून

घरा धान्य येईल का मेहनतीचे...

शेतमाल बाजार भरला

माल विकाया घेऊन आला...

उत्पन्न मिळेल काही त्यातून,

तरी मनी भय अपयशाचे

बाजार भाव तो पडून

कौडी मोलाने ते जयायचे...

तरी प्रयत्न नाही सोडे,

पुन्हा उठून कामा लागे..

यंदा नाही उत्पन्न पुढल्या वर्षी मिळेल,

आस हीच ठेऊन आशेत जगे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy