तुला माहित ही नाही
तुला माहित ही नाही
तुझ्या विश्वात होतो मी तुला माहीतही नाही
तुझ्या प्रेमात होतो मी तुला माहितही नाही
कशी फोडून तू गेलीस माझ्या आरशालाही
तिथे पाऱ्यात होतो मी तुला माहीतही नाही
किती अंगार होता ना तुझ्या नजरेत द्वेषाचा
तुझ्या डोळ्यात होतो मी तुला माहीतही नाही
कशी जाळून तू गेलीस हिरव्यागार रानाला
तिथे वणव्यात होतो मी तुला माहीतही नाही
सुखामध्ये तुझ्या नाही तुझ्या पैशातही नाही
तुझ्या दु:खात होतो मी तुला माहीतही नाही