STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

4  

Manisha Awekar

Tragedy

कृपासिंधू माय

कृपासिंधू माय

1 min
397

कृपासिंधू अनाथांची माता

सेवाभाव निरंतर मनी

वंदन भावे त्रिवार माते

कीर्ती पसरली त्रिभुवनी   (१)


खडतर जीवन माय तुझे

परि राखेतून उठलीस

उंच आकाशी झेप घेऊनी

अनाथांची माऊली झालीस (२) 


अनाथ अभागी बालकांना

तूच माया ममता दिधली

कृपाछत्र तयांना देऊनी

तयांची जीवने उद्धरली  (३)


आधारवड तू अनाथांचा

तयांना दिधले नवजीवन

हाल कष्ट सोसूनी जीवनी

लाविलेस सार्थकी जीवन (४)


असा कसा रे निर्घृण काळा

अनाथांची हरपली माय

कृपाछत्र ओढले तयांचे

बालके रडली धाय धाय   (५)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy