STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

1 min
286

कोसळले अस्मानी संकट

सारे जलमय झाले

निसर्गा पुढती माणूस छोटा

हेच आज सिद्ध झाले


जात - पात अन् धार्मिक तंटे

मिटवुनी क्षणात गेले

कुणी ना मोठा कुणी ना छोटा

सारेच वाहून गेले


वाहून गेली किती चिमुकली

किती माणसे बेपत्ता झाली

मृतदेहाचा खच पाहुनी

सारे आज हवालदिल झाली


उन्मळून पडल्या वृक्षवेली

अन् घरेही वाहून गेली

जनावरास मग कैसा थारा

ती पुरात वाहून गेली


घरे बुडाली पिके बुडाली

निवाऱ्यास नाही काही

पाणीचपाणी चहूकडे

परि पिण्यास पाणी नाही


माणुसकी हाच धर्म आपला

माणसा जाणून घेरे काही

जिवाची पर्वा न करता

फक्त जवान धावून जाई


महाभयंकर संकट आले 

आज माणूस हतबल होई

निसर्गाचा कोप असे हा

निसर्ग देई आणिक घेई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy