Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

samadhan Kalunke बालकवी

Tragedy Others

4.3  

samadhan Kalunke बालकवी

Tragedy Others

दुःख आईबापांचे

दुःख आईबापांचे

1 min
427


!!दुःख आईबापांचे!!

 दुःख तुला आईबापांचे 

     कसे नाही कळले.

  

 जेव्हा काटा तुला टोचला

 अश्रु त्यांच्या डोळी आले,

 तुझी भूक मिटवून

    उपाशी ते राहिले.

 दुःख तुला आईबापांचे 

     कसे नाही कळले.

  

 घामाचा पैसा करून 

  शिक्षणास तुझ्या ओतला

 रक्ताच पाणी करून

   रात्र - दिवस एक केला

 अन् तू घराबाहेर त्यांना काढले

   बाप तुझा ढसा ढसा रडला...


 ९ महिने पोटात ठेऊन

   दुःख सहन तिने केले

 फोड आलेल्या हातांनी

   घास तुला भरविले

 तरी दुःख तुला आईबापांचे 

     कसे नाही कळले.

   

  पदर फाडूनी साडीचा

  ठिगळ कापडाला तुझ्या लावले,

  हाताला धरून तुला बापाने,

   सारे जग दाखविले.

  दुखाच्या दरीत कोसळुन सुध्धा

    सुखाच्या महालात तुला उभे केले.

  अन् त्यांनाच तू आता

     वृद्धाश्रमात नेऊन टाकले.

   खरंच तुला दुःख आईबापांचे 

     कसे नाही कळले.

        कसे नाही कळले.....

         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy