STORYMIRROR

samadhan Kalunke बालकवी

Romance Tragedy

3  

samadhan Kalunke बालकवी

Romance Tragedy

अगं सखे एक काम करशील का?

अगं सखे एक काम करशील का?

1 min
141

अगं सखे एक काम करशील का?

मी हसेल तुला पाहून,

तूही मला पाहून हसशील का?


अगं सखे एक काम करशील का?

जवळ येऊन माझ्या, डोळ्यात बघत बसशील का?

रंगविलेल्या पापण्या मिटवून तुझ्या,

मला हळूच इशारा करशील का?


अगं सखे एक काम करशील का?

हळूवार पणे येऊन मऊ गालाला स्पर्श करणाऱ्या,

त्या बटाला तू सावरशील का?

पण सावरताना मात्र जराशी लाजशील का?


अगं सखे एक काम करशील का?

एक पाऊल मी पुढे येतो,एक पाऊल तू पुढे येशील का?

हळूहळू सामावून घेऊन दोघांना एकमेकांत,

थोडी सुरुवात मी करतो, थोडी तू करशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance