आभाळ फाटलं
आभाळ फाटलं
आभाळ फाटलं माझ्या
अन्नदाता शेतकऱ्यावर
हाता-तोंडाशी खास
निसटला घाव काळजावर
माल काढणीस आला
दुर्दशा काय झाली
नशिबाला जीवनाची पुन्हा
थट्टा कशी मांडली
वाहून गेलं गर ढोर
सगळं पाणी-पाणी झालं
सपान उराशी होतं
दचकन दैवान जागवलं
काळ हा एकदा पुन्हा
शिरजोर पहा झाला
काय दिवाळी-दसरा
उपासमारीचा वेळ आला
कुठ मागाव न्याय
पदर कुणाकडे पसरवा
कुणाला सांगावे गराणे
तुला पण किव ना देवा