STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy Others

4  

Aruna Garje

Tragedy Others

माहेरचे दैवत...

माहेरचे दैवत...

1 min
353

माय बापाविन माहेर

देवाशिवाय देवघर

लागे जीवा हुरहुर

येई दाटुनी गं ऊर


पाय ठेवता दारात

वाटे माय येईल धावत

पाठीवरुनी प्रेमाने

तिचा फिरेल गं हात


बाप बघेल कौतुक

डोळ्यातील आसू लपवीत

माय बापाविन माहेरी

जीव नाही गं लागत


क्षणभर ते दिस

येतील का परत

हळूच शिरेन मी

माय बापाच्या कुशीत


त्यांच्या प्रेमाची सर

नाही कशालाही येत

तेच तर दोघे होते

माझे माहेरचे दैवत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy