STORYMIRROR

Prem Gaikwad

Tragedy

4  

Prem Gaikwad

Tragedy

व्हॅलेंटाईन डे...

व्हॅलेंटाईन डे...

1 min
313

 आज व्हॅलेंटाईन डे ला

आठवण तिची झाली,

अन् खरं सांगतो रात्रभर

मुळीच झोप नाही आली.


डोळ्यासमोर सारा गोड

भुतकाळ उभा राहिला,

आठवला जादूई गोड

स्पर्श तो पहिला..


गोड ओठांचे चुंबन

आठवली गोड मिठी,

सारं काही होतं गोड

काय त्या भेटीगाठी.


हवाहवासा सहवास

हवीहवीशी आठवण,

आज आठवते सजनी

तुझे माझे ग मिलन..


वाटे जन्म घेतला दोघे

हा एकमेकांसाठी,

किती घेतल्या शपथा

का शपथ होती ती खोटी?


केला नियतीने घात

तो झाला महा अपघात,

तू नाहीस या विश्वात

विश्वास च नाही बसत.


येती रोज आठवण

कसा जाईन मी विसरून,

तू माझा जीव की प्राण

कशी गेलीस मज सोडून ?


या व्हॅलेंटाईन डे ला

सांग कुठे भेटू मी तुला?

हे माझ्या प्रितफुला,

हे सर्वस्व अर्पण तुला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy