हसू
हसू
जरा बघा,
तुमच्या ओठांवर आलेलं
ते हसू तर नाही ना
कारण आजकाल
त्यांन माणसाजवळ
जाण बंद केल आहे..
जरा बघा,
तुमच्या जीवनात
त्याचं महत्त्व कमी तर झालं नाही ना
कारण तुम्ही
नुसतं रडत बसला आहात..
जरा बघा,
तुमच्या निरागस बालपणाच्या काळात
डोकावून कारण
हसू तिथे भरभरून यायचं..
जरा बघा,
तुम्ही एक मशीन तर बनला नाही ना
कारण तुमच्या अवतीभवती हसू असून तुम्हाला ते दिसत नाही..
जरा बघा,
तुम्ही त्याला तुमचं दुश्मन
तर बनवलं नाही ना
कारण हसू तुमच्या जीवनातून
नाहीसं झाल्यासारखं आहे..
