STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Romance Fantasy

3  

Gaurav Daware

Drama Romance Fantasy

मर्यादा

मर्यादा

1 min
201

मर्यादा नाही ग मला, 

     कसलीच मर्यादा नाही 

माझ्या अश्रूना मर्यादा नाही 

      तू गेल्या पासुन 

माझ्या हृदयात जागाच नाही 

      तू रुसल्या पासुन 

माझीही इच्छा होते ग 

      तुझ्या जवळ येण्याची 

जबाबदाऱ्या मागे टाकण्याची मात्र

       हिम्मत माझ्यात नाही.

तू जिथे असशील

     कदाचित तुला तिथे रमनार नाही 

नवीन नाते बनवण 

     तिथेही तुला जमणार नाही 

एकटेपणा तुझा तिथे

      मित्रासारखा सोबत असेल 

न बोलताही एकमेकांशी

       कदाचित नव्या ओळी सुचेल 

तू तिथे एकटी न मी इथे एकटा 

  शब्द निघायच्या आधीच अश्रूच मनाला टोचतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama