STORYMIRROR

Rekha Gavit

Drama

3  

Rekha Gavit

Drama

शिवराज्याभिषेकाचा पोवाडा

शिवराज्याभिषेकाचा पोवाडा

1 min
402

रायरेश्वराच्या मंदिरी ।घेतली स्वराज्याची आण।

दाखवून शौर्य आणि चातुर्य । लावले पणाला प्राण।

संगती बाजी ,मुरारबाजी ।तानाजी कोंढाण्याचा तो सिंह।

कळण्या जगा हे शौर्य ।बसवण्या शत्रूला वचक।

स्वराज्य भक्कम करण्या ।योजिला तो राज्याभिषेक।।जी ..जी..जी..


निवडली राजधानी तो गड।अभेद्य रायगड।

मावळे ,प्रधान,मंत्री। कामाची घालती सांगड।

करुन सैन्य पहाणी ।घेऊन माय भवानी चे दर्शन।

अर्पिले भक्तिभावे छत्र । तयार झाले ते सिंहासन।

स्वराज्य भक्कम करण्या। योजिला तो राज्याभिषेक।।जी..जी..जी..


सुरु झाली लगबग ।जाती आमंत्रण ,सरदार ,कामदार।

पौरोहित्य करण्या। आले काशीहून गागाभट्ट।

होऊन तयारी यथासांग। जल आले सप्तगंगा ,समुद्र।

तूप,दही, मध।सोन्याची घागर झाली तयार।

स्वराज्य भक्कम करण्या। योजिला तो राज्याभिषेक।।जी..जी..जी..


सोनियाचा दिनू उगवला। स्वराज्यसूर्य नभी तळपला।

वाद्य गवई वादन।होई सगळीकडे आनंदी आनंद।

सुवर्ण घागरी करती। माझ्या शिवबाचा अभिषेक।

घेऊन जेष्ठ अन माता जिजाऊ चा आशीर्वाद।

स्वराज्य भक्कम करण्या। योजिला तो राज्याभिषेक।।जी..जी..जी..


धन्य जाहली ती माऊली। शिवबाची मायेची सावली।

अष्टप्रधान आशीर्वाद देती।सोन्या मोत्याची छत्रझालरी।

क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर।

 श्री शिवछत्रपती जयजयकार।।

स्वराज्य भक्कम करण्या। योजिला तो राज्याभिषेक।जी..जी..जी..


गडगड नभी गर्जे ती तोफ।साल ते १६७४

झाला तो राज्याभिषेक ।होऊन तयार स्वतंत्र नाणी।

शिवबा झाला तो शककर्ता राजा। जमा झाले प्रजाजन।

देशोदेशीचे आले नजराणे।पसरे किर्ती चोहीकडे।

स्वराज्य भक्कम करण्या।योजिला तो राज्याभिषेक।।जी..जी..जी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama