मुखवटा
मुखवटा
1 min
219
हा प्रत्येक चेहरा अनोळखी; वाटतो आहे!
चेहऱ्यामागचा ओळखीचा; वाटतो आहे !
सावली सुद्धा अंग चोरु; लागलीच आहे!
लाचार तुकडयांसाठी जो-तो,भुंकतो आहे!
पाण्यालाही आज रक्ताचा; वास येत आहे!
माणूस माणसाला खाऊन, वाढतो आहे !
खायचे आणि दाखवायचे;वेगळे आहेत !
तो मुखवटाच चेहरा असली, झाकतो आहे!