STORYMIRROR

SUHAS GHOKE

Drama Romance

3  

SUHAS GHOKE

Drama Romance

हवीहवीशी वाटतेस...

हवीहवीशी वाटतेस...

1 min
292

ट्रेनच्या डब्यात भर गर्दीत ती विंडो सीट जशी हवीशी वाटते.

तशीच तूही हवीहवीशी वाटतेस...


भर उन्हात पावसाची बारीकशी रिमझिम धार जशी हवीशी वाटते.

तशीच तूही हवीहवीशी वाटतेस...


शिक्षकांना महत्त्वाच्या शब्दांखाली अंडरलाईन जशी हवीशी वाटते.

तशीच तूही हवीहवीशी वाटतेस...


लहान चिमुकल्यांना रोज आपली आवडती टाॅफी जशी हवीशी वाटते

तशीच तू ही हवीशी वाटतेस...


पाणीपुरीची प्लेट संपवली तरी शेवटी एक सुखी पुरी जशी हवीशी वाटते.

तशीच तूही हवीहवीशी वाटतेस...


गरम भजी संग झणझणीत मिरची जशी हवीशी वाटते 

 तशीच तू ही हवीशी वाटतेस...


रात्री आकाशात चंद्राच्या जोडीला चांदण्यांची गर्दी जशी हवीशी वाटते.

तशीच तूही हवीहवीशी वाटतेस


पहाटे पहाटे दिवसाची सुरवात ला एक कप चहा जसा हवासा वाटतो 

तशीच तू ही हवीशी वाटतेस...


सन साजरे करताना उत्साह जल्लोष धुमाकूळ जशा हवासा वाटतो 

तशीच तू ही हवीशी वाटतेस...


आपल्या सुखात दुःखात कोणाची साथ जशी हवीशी वाटते 

तशीच तू ही हवीशी वाटतेस...


एवढेच नव्हे माझ्या आयुष्यात 

प्रत्येक क्षणाक्षणाला तू हवीहवीशी वाटतेस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama