STORYMIRROR

Rohan Dhage (RB)

Drama Others

3  

Rohan Dhage (RB)

Drama Others

काळजावरचा दगड

काळजावरचा दगड

1 min
257

तुझ्या काळजावरचा

दगड बाजूला ठेवं,

उरी आग लागलेली

आता तर विझवं.

पूजलं तुला रोज-अन

धरली किती उपासं रं,

घरटं बांधून उडून गेली

कायमची रं पाखरं.

करतो तुला विनंती मी,

शोधून तरी दावं.

उरी आग लागलेली

आता तर विझवं.

स्वप्न दाखवून कशी

देवा केली ताटातूट,

हृदयाची राख झाली

बघ डोळे उघडून नीट.

होतं नव्हतं सारं गेलं,

कसा मणी ठेऊ भावं.

उरी आग लागलेली

आता तर विझवं.

जो येतोय तो

दुःख देऊनी जातोय,

भरलेल्या जखमेवर

मीठ घालूनी पाहतोय.

तूच सांग रोज रोज,

कसा सोसू तरी घावं.

उरी आग लागलेली

आता तर विझवं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama