STORYMIRROR

Rohan Dhage (RB)

Inspirational

3  

Rohan Dhage (RB)

Inspirational

*आई मध्ये बाप पाहिला*

*आई मध्ये बाप पाहिला*

1 min
231

माझ्या काळजातून

माझ्या श्वासातून

माझ्या ओठातून

माझ्या अंतकरणातून पहिला शब्द आई निघाला,

आई तुझ्या मध्येच मी माझा बाप पाहिला...

आई तू माझ्यासाठी भर उन्हात

शेतामध्ये तळत राहिलीस,

मी शिकून मोठा व्हावं म्हणून

माझ्या भोवती दिवा होऊन जळत राहिलीस.

दिवसभर कष्ट करून तुला

पाच-दहा रुपये मिळायचे,

तुझ्या हातातून रुपया घेतांना

माझ्या नैनी आश्रू गळायचे...

केलास हाताचा झुला

आणि झुलवलस त्याच्यामधी,

तुझ्या कष्टाचं पारणं फेडाया

आगं ते दिवस येईल कधी...

मला दिलंस पोटभर खाया

स्वतः राहिलीस उपाशी पोटी,

आता चारीन पंचपक्वान्न आन

भरीन तुझी सोन्यानं ओटी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational