STORYMIRROR

Rohan Dhage (RB)

Inspirational

3  

Rohan Dhage (RB)

Inspirational

रमाई तू या जगाची शानं...

रमाई तू या जगाची शानं...

1 min
229

किती छळलं तुला

एका घोटा साठी,

खावून पाव तुकडा

जगली आमच्यासाठी.

कशे सांगू तुझे गुणगाणं,

रमाई तू या जगाची शानं...

रमाई माता

तुझी रे साऊली,

दिन दुबळ्यांची

झाली ती माऊली.

फाटक्या चोळीत तिचं समाधानं,

रमाई तू या जगाची शानं...

लंडन अमेरीका

साहेब तुम्ही जाता,

दोन दोन चार दिसं

उपाशीच राहता.

अर्धी भाकरीच खाईन सुखानं,

रमाई तू या जगाची शानं...

गळ्यात नाही

फुटका मणी,

सदा मुखात

गोड गोड गाणी.

गाडा संसाराचा ओढला एकटीनं,

रमाई तू या जगाची शानं...

चार चार पोरं

हातून गेली,

इच्छा पंढरीची

राहून गेली.

नाही रुसली कधी ती कशाणं

रमाई तू या जगाची शानं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational