STORYMIRROR

Rohan Dhage (RB)

Others

4  

Rohan Dhage (RB)

Others

मुक्तछंद (विरह)

मुक्तछंद (विरह)

1 min
277

तिला माझी दररोज आठवण येते

पण,ती तिच्या मुलाला गोंजारत 

मन हलकं करत असते


भरपूर बोलावं वाटतं पण

न बोलताच तिचा दिवस संपतो,

सुखात आहे असेच सांगतात सर्व

मला का बरं वाटतं ती नेहमीच झुरते


त्याने शरीराने बांधून ठेवलंय

पण,ती अंतर मनाने 

दररोज मला भेटून जाते


पैशाने विकत घेता येते 

खूप काही संपत्ती,

जो आनंद तिला माझ्या कवेत मिळायचा

तो तिचा नवरा विकत घेऊ शकत नाही


तो रागावतो म्हणे तिच्यावर

लग्न मंडपात तर खुश दिसत होता,

कशाचीही कमी पडू देणार नाही

वचन दिलं होतं त्याने

तिच्या पदरात एक प्रेमाची

मिठी ही टाकू शकला नाही


त्याला गर्व होता खूप 

ती लवकर विसरेल मला,

आता उगच तो तिचा

मोबाईल चेक करत नाही


ती बंधिस्त कधीच

राहिली नाही माझ्या जवळ,

मंगळसूत्राने तिच्या जीवनातले

रसच काढून टाकले असावे


त्याने घराला कितीही 

पक्के दरवाजे लावले,

तरी तो तिच्या भावनांना 

माझ्या पर्यंत थांबवू शकणार नाही...


Rate this content
Log in