बाप हा बाप असतो
बाप हा बाप असतो
एका भाकरीचे चार तुकडे करून,
बायको पोरांना देतो,
त्यातील एक तुकडा स्वतः खातो.
बाप हा बाप असतो...
सना सुदीच्या काळात,
पैसे जवळ नसतांना,
घरोघरी हात पसरतो,
बायको पोरांना नवीन,
कपडे घेऊन आपण स्वतः,
जुनेच कपडे घालतो.
मुलांच्या शिक्षणासाठी,
राब राब राबतो,
त्यांना कशाची कमी पडू नये म्हणून,
स्वतः आतल्या आत झिजतो.
मुलीच्या जन्मापासून तिचे,
सर्व हट्ट पूर्ण करतो,
आपली लक्ष्मी आहे म्हणून,
तिची पूजा देखील करतो.
मुलीच्या शिक्षणाला कितीतरी ,
पैसे खर्च करतो,
परकं धन असून पण,
त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो.
बाप हा बाप असतो...
मुलीच्या लग्नाच्या दिवशी पण,
केवढी धावपळ करतो,
एकट्यात बसून मात्र ,
ढसा ढसा रडतो.
मुलगा जन्माला म्हणून,
घरोघरी जाऊन पेडे साखर वाटतो,
माझ्या वंशाचा दिवा पेटला म्हणून,
गावभर दवंडी देत फिरतो.
बाबा म्हणण्याचा आवाज,
दिवसातून कितीतरी वेळा ऐकतो,
मुलगा घरी नाही दिसला की,
लगेच बायकोला विचारतो,
मुलाच्या प्रत्येक सुखा-दुःखात,
खंबीर पण उभा राहतो.
कारण बाप हा बाप असतो...
