खरं की? खोटं
खरं की? खोटं
कोरोना खरा की खोटा
का? यात पुढाऱ्यांचाच वाटा,
गरीबांच्या खिशातल्या
चालल्यात नोटावर नोटा...
सर्दी नाही खोकला नाही
तरीही आले पोसिटीव्ह,
वँक्सीन न घेताच कसा
रिपोर्ट येतो निगेटिव्ह...
थोडासा ताप आला की
म्हणे कोरोना टेस्ट करा,
त्यांच्या सोबतच परत
लघवी रक्तही चेक करा...
गरीबाने एवढा पैसे
आणावं तरी कुठून,
मरणाच्या भीती पाई
डोळे आले दाटून...
उसने पासने कसेतरी
पैसे केले गोळा,
डॉक्टराचं भरलं पोट
आता मेडिकल वाल्याचा डोळा...
दादा भाऊ म्हणे
एवढ्या गोळ्या घ्या,
बरं नाही वाटलं तर
म्हणे परत लवकर या...
लगेच गेलो मेडिकल वर
अन पावती दिली हातात,
म्हणे अर्ध्या गोळ्या नका घेवू
फक्त हजार रुपये होतात...
वाटलं होतं मला फक्त
दोन चार गोळ्या घ्यावं,
एवढा इलाज करून
बरं वाटतं का पाहावं...
