दगडाचा देव
दगडाचा देव
सांगा आपल्या देशात
दगडाचा देव कसा झाला
अमिरेकेत म्हसोबा नाही
याच देशाला देव सापडला ॥१||
ताजे नैवद्य देवाला
अन शिळे अन्न खाती
का?विसरलास कर्तव्य
माणसा अशी कशी रे नीती||२||
निष्पाप पशुचा बळी देती
कारणं दावून आपणच खाती
सांग तुला माणूस कसा म्हणू
देवाला निष्पाप बकरा कापती॥३॥
लिंबू नारळ उतरवून
का फेकून मानवा देतो
भोंदूबाबा चे का ऐकून रे
कर्माची किंमत शून्य करितो||४||
इतरांस बोलायला भाव खाई
राऊळत नित्यनियमाने जाई
दगडासाठी जीव होतो लाही लाही
वाटते मला ही नवलाई||५||
कलबुर्गी,पानसरे,दाभोळकर
दिली प्राणाची आहुती
अंधभक्ती दूर करण्यासाठी
त्यांच्या जळल्या देह वाती॥६॥
