STORYMIRROR

Suraj Angule

Others

4  

Suraj Angule

Others

वसुंधरेच दूध....

वसुंधरेच दूध....

1 min
290

जा चांदणीच्या वंशाला

बस चंद्राचे रे लाड,

ओरडून सांगे तारा

ग्रहाने उघडे कवाड //१//


ढगांच्या प्रपंच्यासाठी

मंगळावरी थाटला संसार,

शुक्रा माझी सुनबाई

आकाशी स्वच्छ वावर //२//


लाभे सूर्याचा आधार

किरणाला जन्म दिला,

विजेने त्याचा सहज

खुशीने सांभाळ केला //३//


पृथ्वीने मायेचा हात

फिरवत गोंजारले,

पावसाच्या ओलाव्याने

प्रकाशाला सुखी ठेवले //४//


वसुंधरेच दूध प्या

निरोगी राहू आपण,

खळ्यातलं जीवन

सप्तरंगी लावू ऋण //५//


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन