आयुष्याच्या संध्याकाळी
आयुष्याच्या संध्याकाळी


आयुष्याची सकाळ गेली
दुपार गेली आता आली संध्याकाळ
जनु हिवाळ्यात निष्पर्ण झाले
गुलमोहराचे झाड
चेहऱ्यावर पसरले म्हातारपण
सांधे सांधे दुखायला लागले
जणु अजीर्ण झाले बुद्ध काळातले महाल
तरुणाई ताठ चालत होतो
आता काठी सोबतीनं झाली
माझ्या पाठीच्या कन्या न
काय रे प्रगती केली
जीवनाची पन्नास वर्षे
सारेच सोबती होते
माझ्या एकट्याच्या सावलीखाली
कुटुंब चालत होते
सावली संपता संपता
सारी पाखरं उडून गेली
बघता बघता सारी
क्षितिजापार झाली
कुठल्या आशेवरती
सोडून सारी गेली
अशी कशी रे सारी निष्ठुर झाली
आयुष्याची ज्योत ज्योत आता
काळोख रात्रीची वाट बघत राहिली