सप्रेम
सप्रेम


दूर रात्रीच्या चांदण्या ची
वाट बघु कशी
अनंत दुःखांना
हसु मी देऊ कशी
लाज जगाची राखली
आणि मी लाजरी झाली
भोळ्या तुझ्या मनाला
हात देऊ कशी
बोहल्यावर चढतांना
हिरमुसले प्रत्येक क्षणी
अश्रूंनी तुझिया केली
माझी पायधुनी
आई-बाबांकरिता
जाळली स्वप्नांची होळी
p>
सुख शोधाया निघाली
तुझे प्रेम वेडी
खिळले हे डोळे
बघा या तुझे रूप
दिस जाईल रे वेड्या
वाट बघण्यात खूप
नको सोडूस यातना
या भयाण सत्याची
नको भिजवूस पापणी
त्या थोड्याशा सुखाची
मी कर्तव्य करेन आता
तू नवी हाक मार
स्वप्नात रंगून तुझ्या
झाले आता दिस पार