अबोल प्रीती
अबोल प्रीती

1 min

18
प्रीती तुझी आणि माझी
हृदयात कोरलेली
ही जन्म जन्मांतरीची
अशी नाती जुळलेली
सांग साजना खुशाल
काय तू लपवलेलं
खेळतय जे श्वासात
जिव्हेवर अडलेलं
किती रे घाबरशील
किती रे लपवशील
आता सांगून टाक ना
किती रे तू छळशील
नाती ही युगायुगाची
स्वप्ना परी सजलेली
जागेपणी जगलेली
निशब्द ही बोललेली