मन हे व्यथित झाले
मन हे व्यथित झाले
1 min
205
सोसून घाव सारे
रक्तांचल झाले
विश्वासघाताने तुझ्या
मन हे व्यथित झाले
स्वप्न पंखी होते मन
रमले होते प्रत्येक क्षण
क्षणभंगुर होता क्षणी
मन हे व्यथित झाले
क्षणिक निर्णय चुकले
व्यवहार ज्ञान ही हरले
जगती कोण आपले
मन हे व्यथित झाले
मन कर घट्ट आता
सोडून द्यावी अपेक्षा
स्वतःचाच मित्र स्वतः तू
मग मन का व्यथित झाले
