गुरू
गुरू
गूरू तूच पूर्णभक्ती
गुरू तूच आत्मशक्ती
गुरू तूच आत्मज्ञान
गुरू तूच हो महान
गुरू तूच माझा कर्ता
गुरू तूच माझा धर्ता
गुरू शिकवतो शौर्य
गुरू देई मनी धैर्य
गुरू तूच मला तारी
होतो मी एक भिकारी
तुझा अथांग खजिना
ज्ञान सारेच स्वीकरी
गुरू श्रेष्ठतम बुद्ध
करी ज्ञानाने प्रबुद्ध
गुरु ते आंबेडकर
चाले लोक अवरुद्ध
गुरु ज्ञानेश्वरी ठाई
गुरु त्या सावित्रीबाई
एक शिकवी लढाया
एक संघर्षाची खाई
गुरु गोविंद गोविंद
गीतेतील समतोल
ज्ञान अर्जुनास देई
घालवली घालमेल
शिवराय शिवराय
राजेहून ते महान
उभे केले हो स्वराज्य
दिले हो आत्मसन्मान
माझी गुरु माझी आई
संसाराची दै तालीम
पिता शिकवी गणित
व्यवहार हो जालीम