तुझ्यात विरणे
तुझ्यात विरणे

1 min

11.8K
भेटले ना शब्द आपुले,
ना झाली नजरेची गाठभेट...
तरी तुझ्या अस्तित्वाची जाण,
हृदयाचा ठोका, चुकवी थेट...१
बरसत होता पाऊस तुफान
त्या राती वाकले होते घन…
धरणीला तो भेटला भरभरून
पण कातर, होते माझे मन...२
अनोळखी पुन्हा झालो आपण
काही शब्दांचीच होती भूक...
संसाराच्या नात्यातील वचनाने
दोघांनाही केले, होते मूक...३
प्रीतीचे बंध अस्पष्ट काही, अन्
गतकाळात आता झुरणे…
मिलन नशिबी नसता या जन्मी
आठवून तुला तुझ्यात विरणे
आठवून तुला तुझ्यात विरणे
आठवून तुला तुझ्यात विरणे...४