डॉक्टर काका
डॉक्टर काका

2 mins

12.1K
अहो भीती वाटतेय
मला डॉक्टर काका,
आधी हातातलं ते
इंजेक्शन फेका...
कोठून करता तुम्ही
औषधे रंगबेरंगी गोळा,
खायला देता सकाळ,
दुपार रात्री तीन वेळा…
तापाच्या त्या असतात
गोळ्या कडू कडू,
पाहून तुमचा दवाखाना
येतं ढसाढसा रडू...
खोकल्यासह नाक
वाहते फुरू फुरू
वाफेसोबत सिरप
सुद्धा ठेवता सुरू…
मस्ती केली की
लगेच म्हणते आई,
पिंट्या इंजेक्शनला
मी नेईन बाई…
सायकलने वळणावर
मला धाडकन पाडलं
ढोपर खोलवर फुटलं,
शर्ट टरकन फाटलं…
एरवी बकतो कसेही
तुमच्याबाबत निरंतर,
तुम्ही आठवला तेव्हा
रडताना आईनंतर...
मलम जखमेला लावताना
सकल घावही भरता
कितीही थकला तरी
आम्हाकरिता झटता…