ऐक ना
ऐक ना


ऐक ना, थोडं थांब ना
सुखात साथ येणार नाही देता
दुःखही वाटून येणार नाही घेता
का, अट्टहास हा करतोस?
घाव तुला द्यायचे नाहीत मला
न भरणारे व्रण सोसणार नाहीत तुला
जरा, विचार कर ना
प्रेयसी असते क्षणांसाठी
style="background-color: transparent; color: rgb(0, 0, 0);">मैत्रीण असते जन्मासाठी
ते बघ, किती छान जीवन
आनंदात तुझ्या बेधुंद नाचेन
दुःखातसुद्धा भरभरून रडेन
ऐक ना, थोडं थांब ना
हे क्षण मला गमवायचे नाही
तुझ्या अश्रूंचे कारण व्हायचे नाही
ऐक ना, थोडं थांब ना...