थांबशील का?
थांबशील का?
आलास तू न्यायला, मान्य आहे मला,
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?
कळले मला जीवनाचे सार,
मागत नाही काही फार,
नजरेने न्हाऊ घालते कोवळ्या बाळा,
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?...१
घडवायची आहे आई-बाबांना काशी,
स्वप्न मी पेरली आता कुठे उराशी
जडला सख्याशी जीव हा भोळा
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?...२
e="background-color: transparent; color: rgb(0, 0, 0);">हो, केला मी खूप नात्यांचा अवमान,
पैशामागे सदा धावुनी वेगवान
साक्षात्कार झाला तुझ्यामुळे डोळा,
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?...३
काहींना सांगायचंय काहींचं ऐकायचंय,
शब्दांचे राहिलेले हिशोब मांडायचेय
जायचे नाही ठेवुनी डाग असा भाळा
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?...४
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?
जरा... थांबशील का, क्षणभर इथे काळा?