STORYMIRROR

अनिकेत सागर

Tragedy

3  

अनिकेत सागर

Tragedy

===गझल===**तलाव**

===गझल===**तलाव**

1 min
11.9K

पोरीस छेडण्याचा....झाला ठराव आहे

रस्त्यात वासनांचा जमला जमाव आहे


गर्दीत माणसांच्या माणूस पण हरवले

मदतीस धाव लेका त्यालाच वाव आहे


का? मीच सोडल्याचा घेतेस आळ आता

हळव्या मनावरी तू... केलास घाव आहे


चोरी करून गेले......माझ्याच ते मनाची

अन् आज चोरट्यांनी रचला बनाव आहे


परतून आज आई ये जीवनात माझ्या

डोळ्यात आसवांचा भरला तलाव आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy