STORYMIRROR

अनिकेत सागर

Romance Tragedy

4  

अनिकेत सागर

Romance Tragedy

मागे वळून बघ

मागे वळून बघ

1 min
367

काय सांगू या जीवाची किती होते तगमग

एकदा जाताना मला बस मागे वळून बघ...


अजूनही मी उभा त्या नाजूक वळणावरती

आठवणीत काळजाला ही आलीया भरती

सोडलं करून बेभान विरहात होते घुसमट

एकदा जाताना मला बस मागे वळून बघ...


दिस रात या मनात राहतो तुझाच विचार

प्रेमात जडलाय जीव झाला प्रेमाचा विकार

हवी मला एक जीवनभर सखे तुझी सोबत

एकदा जाताना मला बस मागे वळून बघ...


समजावू कसे सांग ना भाबड्या आसवांना

झरत चालले गं सावरू कसा मी यातनांना

जीव कासावीस झाला नकोसे वाटे सारे जग

एकदा जाताना मला बस मागे वळून बघ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance