STORYMIRROR

अनिकेत सागर

Romance

4  

अनिकेत सागर

Romance

मन लागत नाही

मन लागत नाही

1 min
378

दिस सरत नाही रात ढळत नाही

तुझ्या आठवणीत मन लागत नाही...//धृ//


वाटतोया दिस एक वरीस समान

टाक रित्या झोळीत पिरमाचं दान

झरा विरहाचा कसा हा आटत नाही

तुझ्या आठवणीत मन लागत नाही...//१//


घुसमट होते गं सखे या जीवाची 

पुरी कशी होईल कहाणी पिरतीची

शेवट हा कहाणीचा का होत नाही

तुझ्या आठवणीत मन लागत नाही...//२//


तुझ्याविना संसार झालाय फाटका गं

घराचा उंबरा ही झालाय तुटका गं

ओठी मी नाव दुसऱ्याचे घेत नाही 

तुझ्या आठवणीत मन लागत नाही...//३//


दिस सरत नाही रात ढळत नाही

तुझ्या आठवणीत मन लागत नाही...//4//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance