STORYMIRROR

अनिकेत सागर

Others

4  

अनिकेत सागर

Others

आयुष्याघ्या वाटेवर

आयुष्याघ्या वाटेवर

1 min
385

आयुष्याच्या वाटेवर प्रिये

वाट तुझी मी पाहत आहे

येशील चोरपावलांनी जीवनात

आस मनाला लागत आहे...


नको तरसवू ना तू सखे

नको जाळू गं माझा जीव

थोडी कर दया या जीवावर

कर माझ्यावर थोडीतरी कीव...


आयुष्याच्या वाटेवर प्रिये

नाही मी तुला एकटं सोडणार

तू क्षण सोबतीचे जगून बघ

दुःख नाही वाटेला येऊ देणार...


साथ जन्मांची देईन तुला

येऊ देणार नाही संकट

आपल्या दोघांच्या संसारात

करेन काहीही मी खटपट...


या जीवाला तुझी गरज आहे

तू सुखी रहावस वाटत मला

आयुष्याच्या वाटेवर जगताना

तुझा आधार हवा वाटत मला...


Rate this content
Log in