नाजूक फुलावरी
नाजूक फुलावरी
1 min
831
जीव जडला माझा या नाजूक फुलावरी...//धृ//
धरा नटली हिरवाईने मज भूरळ पाडते
फुलपाखरू भोवती भिरभिर हे फिरते
निसर्गाचा सहवास लाभलाय जरी
जीव जडला माझा या नाजूक फुलावरी...//१//
कोवळी पाकळी ही लाजेने उमलली
रूप तिचे पाहता मनी माझिया वसली
मन वेडावले कोवळ्या त्या कळीवरी
जीव जडला माझा या नाजूक फुलावरी...//२//
निसर्ग बहरला इंद्रधनू नभी आला
सप्तरंगी छटांचा भाळला मनाला
श्रावणाच्या प्रीत धुंद बरसल्या सरी
जीव जडला माझा या नाजूक फुलावरी...//३//