STORYMIRROR

अनिकेत सागर

Others

3  

अनिकेत सागर

Others

*// आईला मी रोज मरताना पाहिलं

*// आईला मी रोज मरताना पाहिलं

1 min
257

आला घरी दारू पिऊन बाप

रोज झालाय डोक्याला ताप

चपलेने मारताना मी पाहिलं

आईला मी रोज मरताना पाहिलं...//१//


नवरा म्हणून इच्छा पुरी केली नाही

कधी प्रेमानं विचारपूस केली नाही

आजवर घरासाठी झुरताना पाहिलं

आईला मी रोज मरताना पाहिलं...//२//


शिवीगाळ करून हुकूम चालवतो

चार चौघात तिची लाज काढतो

माझ्या आईला मी रडतांना पाहिलं

अखेरचं आईला मी मरतांना पाहिलं

अखेरचं आईला मी मरतांना पाहिलं...//३//



Rate this content
Log in