Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

कवी अनिकेत मशिदकर

Others

4.3  

कवी अनिकेत मशिदकर

Others

हिंदोळा आठवणींचा

हिंदोळा आठवणींचा

1 min
397


बांधले तोरण भावनांचे

त्याला विरहाची झालर

आठवणीच्या हिंदोळ्यावर

पसरली दुःखाची चादर...//१//


मनात येता विचार तुझा सखे

वाहू लागला आसवांचा पूर

साथ हवी होती जीवनभर

दिसतो स्वप्नात फक्त तुझा नूर...//२//


सोडून गेलीस ना साजणे तू

मला त्या अधुऱ्या वळणावर

वाट पाहतोय अजूनही मी

त्या धुंद सागरी किनाऱ्यावर...//३//


ये परतुनी पुन्हा जीवनात

प्रेमरंगांची करूनी उधळण

विरहाचा थांबवून वारसा

मिलनाचे दोघं जगू या क्षण...//४//


आस ही उरली मनात माझ्या

जीवनाची झाली सुनी मैफिल

कधी मिळणार तुजविण सखे

माझ्या सुखी आयुष्याची मंजिल...//५//


कर विचार माझा थोडा

ये पुन्हा जीवनात माझ्या

कहानी प्रेमाची अधुरी गं

आहेस तू हृदयात माझ्या...//६//


Rate this content
Log in