// लाखात एक माझी बहीण //
// लाखात एक माझी बहीण //


रुसणं फुगणं भांडणं यातच
भाऊ बहिणीचं नातं मुरतं
नसेल भांडण नसेल रुसवा
तर नावापुरतं फक्त हे उरतं...//
जरी लहान असलो तरी मी
माझ्या ताईचं रक्षण करतो
ताई माझा जीव की प्राण
तिच्यासाठी जे हवं मी करतो...//
धाक दावते जरी मला पण
प्रेम मात्र ती अमाप करते
माझा येडा भाऊ म्हणूनी
प्रेमाची मज ती हाक मारते..//
लाखात एक माझी बहीण
गर्वाने मी जगास सांगतो
ताई कधी सोडणार नाही
वचन राखी बांधताना देतो...//
मनातले माझ्या सारे काही
सांगताना ती होते मैत्रीण
कवेत घेते क्षणात मजला
कधी असते मायाळू बहीण...//
लाडाची गं गोड गोजिरी तू
ताई माझी लाडकी बाहुली
कधी बनते आई आपली तू
देतेस माया जशी माय माऊली...//