शेतकऱ्यांची व्यथा
शेतकऱ्यांची व्यथा


अरेरे माझ्या शेतकरी बांधवा
तू घेऊ नको फाशी
नाहीतर जग राहील उपाशी
शेतकरी रोज शेतात राब राब राबतो
पण नेत्यांना निवडणुकीच्या वेळीच तेवढाा दिसतो.
लाल फितीचा कारभार आणि योजनांचा फार्स
दुष्काळामुळे घशाखाली उतरत ही नाही घास
शेतात तू करतोस नांगरणी अन् पेरणी,
निवडणुकीच्या वेळेस नेते करू पाहतात तुझी मनधरणी..
कर्जमाफी करतो म्हणून सत्तेत येऊ पाहतात
सत्तेत आल्यावर कसेेेे बरे हे तुला विसरतात ?
कधी जाणार हा ओला व सुका दुष्काळ
तरच येईल शेतकऱ्यांच्या दारी चैतन्यदायी सकाळ
लवकरच येऊ दे बळी राजा चं राज
तरच आणि तरच उतरेल नेत्यांचा माज
भारत वर्षाला गरजेची आहे नवी शेत क्रांती
तरच खऱ्या अर्थाने साजरी होईल मकर संक्रांति
कोणाला सांगू शेतकऱ्यांची व्यथा
कारण सर्व च राजकीय पक्षांना हवी आहे आपली सत्ता...
अरे माझ्या शेतकरी बांधवा
तू घेऊ नको फाशी
नाहीतर जग राहील उपाशी....