का?
का?
नात्याच्या दोन बाजू असूनही
तोंडं एका बाजूने का बोलतात
स्वतःची चूक असतानादेखील
सर्रासपणे त्याच चुका का खोडतात
पुढच्या व्यक्तीच्या वेदना दिसत
असल्या तरी दुप्पट का करतात
भावनांना जोडता येणार नाही
पण पुन्हा पुन्हा का तोडतात
यांचा नकारात्मक दृष्टिकोन
सारखा तराजूत का तोलतात