जीवनातील वाट
जीवनातील वाट


जगण्यासाठी संघर्षातून वाट ही शोधावी
जीवनातील वाट हिंमतीने काढावी॥धृ॥
भेगाळलेल्या वाटेवरी धुळ ही पसरवावी
काट्या-कुट्यांनी भरलेली वाट ही मळवावी॥१॥
जखमेने जीव घायाळ होई हदयाला ही फोड येई
गाव हा गाठण्यासाठी दुरचे अंतर पार करण्याची घाई॥२॥
सुख-दुःखाने भरलेली वाट ही लागे तुडवावी
मळलेल्या वाटेवरी मखमलीची दाटी व्हावी॥३॥