बळीराजा
बळीराजा


कसे सांगावे माझ्या
बळीराजाचे हाल
कधी कोरडा तर कधी
ओल्याने भिजतो माल..!
नापिकी कायम पुजलेली
न मिळे पिकाला हमीभाव
साऱ्या अपेष्टा सहन करुनी
बदले ना त्याचा स्वभाव
बळीराजाला काय पावसाळा
नि काय तप्त उन्हाळा
कष्ट अंगवळणी पडले
कसे येणार कंटाळा..!
देशाचे पोट भरण्या तो
करत नाही स्वतःची कदर
खंत वाटे मला एकच
त्याच्या नशिबी मीठ-भाकर
दुःखातच काढतो जीवन
तू रे माझ्या बळीराजा
तुझ्या मदतीला कोण येतो
नेत्यांच्या घरी मात्र गाजावाजा
कोरोनामुळे होतोय सगळीकडे हाहाकार
शेतकरी पोसतोय तरी कोणी करत नाही जयजयकार