STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Romance Tragedy

3  

परेश पवार 'शिव'

Romance Tragedy

आवेगाची खूण

आवेगाची खूण

1 min
11.4K

ही लाट अशी बेभान,

येतसे बघा खवळून


मनी विचार भेटायाचा,

किनाऱ्यास जरा जवळून


आसुसल्या भेटीसाठी, 

धडपड ही दोन जीवांची


उद्ध्वस्त होऊनी जाती,

एकमेकांना कवळून


उद्ध्वस्त किनारा आणि

थकल्या लाटेचे पाणी


ही इतुकी मागे उरते, 

एक आवेगाची खूण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance