STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Others

3  

परेश पवार 'शिव'

Others

ठसे पावलांचे

ठसे पावलांचे

1 min
298

मना लागली सदा भिंगरी,

तसे पावलांचे..

सैरावैरा धावतसे मन..

पिसे पावलांचे..

कातर होता समय कसे मन,

बसे पावलांचे..

दुःख न बघता होते केवळ,

हसे पावलांचे..

रातीत सयींच्या पाऊल हे कसे,

फसे पावलांचे?

हिशेब मांडा तपासून घ्या,

खिसे पावलांचे..

सकाळ होता निघून जाती..

ससे सावल्यांचे..

मनावरी परि कितीक उरती..

ठसे पावलांचे..


Rate this content
Log in